गगनबावड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, भुईबावडा घाटात दरड कोसळली

 गगनबावड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, भुईबावडा घाटात दरड कोसळली

कोल्हापूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापुरात गगनबावडा घाटात काल ढगफुटी सारखा पाऊस कोसळला, यात संध्यामठ परिसरात एका घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीवर वीज पडली.
गगनबावडा इथं घरांघरांमध्ये पाणी शिरले होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील
गगनबावडा परिसरात सायंकाळपासून ढगफुटी सदृश्य पावसानं हजेरी लावली. सुमारे तीन तास
ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं.
दरम्यान, भुईबावडा घाटात दरड कोसळल्यानं
रस्ता बंद झाला आहे.

गेले दोन दिवस गगनबावड्यात
ढगाळ वातावरण असलं तरी पावसाचा जोर नव्हता. ढगफुटीसदृश पडलेल्या पावसानं पाणीच पाणी झालं.
गटारे, वहाळाचे पाणी काही ठिकाणी पात्राबाहेर आले. चरायला सोडलेली गुरेही घरी परतली. सुमारे तीन तासांहून
अधिक काळ पावसानं झोडपून काढलं.

भुईभावडा घाटात वैभववाडी
तालुक्याच्या हद्दीत दरड कोसळून रस्ता बंद झाला. गगनबावडा इथल्या
काही घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.
कोल्हापूर शहरासह अन्य ठिकाणीही जोरदार पाऊस झाला. सगळीकडे पाणीच पाणी झालं.

संध्यामठ परिसरात
वीज पडली, पाऊस सुरु असतानाच आकाशात
विजेचा कडकडाट सुरू होता.
विजांचा आवाज इतका जोरदार होता, कानठळ्या बसत होत्या. याच दरम्यान शिवाजी पेठ- संध्यामठ परिसरात एका घराच्या
छतावरील पाण्याच्या टाकीवर
वीज पडली.सलगचा पाऊस खरीप पिकांना पोषक असून आगामी तीन दिवस पाऊस होईल, असा अंदाज
हवामान विभागाचा आहे.

काल सकाळी आठ
वाजल्यापासूनच सूर्यनारायणाने आपले रौद्ररूप दाखविण्यास सुरुवात केली होती. दहा वाजता तर
शहरातील रस्त्यावरून जाताना
अंगातून घामाच्या धारा निघत
होत्या. दुपारी पाऊस झाल्यानंतर वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.

PGB/ML/PGB
24 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *