ओबीसी – मराठा दंगल घडवून आणण्यात शरद पवार अपयशी
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ओबीसी आणि मराठा यांच्यात यशस्वीपणे दंगल घडवून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अपयशी ठरले असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने जातीय फूट पाडून मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा निर्धार केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, हे सर्व पक्ष निवडणुकीतील यशासाठी द्वेष, जात आणि रक्तपात घडविण्यावर अवलंबून असतात. राष्ट्रवादीने (शरद पवार) ओबीसी आणि मराठा यांच्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना जातीभेदाचा फायदा घ्यायचा होता आणि आरक्षणाच्या मुद्यावर मात्र मौन पाळायचे होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती असल्यानेच महायुती जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ML/ML/PGB 22 Sep 2024