सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल झाले हॅक

 सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल झाले हॅक

नवी दिल्ली,दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाले. या चॅनेलवर सध्या यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सने विकसित केलेल्या एक्सआरपी या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या युट्यूब चॅनेलवर न्यायालयातील न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. युट्यूब चॅनेलचा वापर प्रामुख्याने घटनात्मक खंडपीठांसमोर सुचीबद्ध केलेल्या खटल्यांची सुनावणी आणि सार्वजनिक हितांच्या प्रकरणांवरील थेट सुनावणीसाठी केला जातो. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनेल हॅक झाल्याचे उघडकीस आले. केंद्रीय तपास यंत्रणाही या हल्ल्यामुळे सतर्क झाल्या असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची वेबसाईटही हॅक करण्यात आली होती.

हॅकर्सनी सुप्रीम कोर्टाच्या युट्युब चॅनलला लक्ष्य केले असून हे चॅनल हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सनी या चॅनलवर क्रिप्टोकरन्सी XRP ची जाहिरात दाखवण्यास सुरुवात केली. XRP क्रिप्टोकरन्सी ही अमेरिकेतील एका कंपनीने विकसित केली आहे. चॅनल हॅक केल्यानंतर हॅकर्सनी सुप्रीम कोर्टाचे नाव बदलले असून त्याच्या जागी Ripple असं नाव झळकावले आहे. या चॅनलवर सुप्रीम कोर्टाच्या व्हिडीओंच्या ऐवजी क्रिप्टोशी निगडीत व्हिडीओ दाखवले जात होते. हॅकर्सनी केलेला हा हल्ला अत्यंत गंभीर आहे कारण यावर सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीचे व्हिडीओ असतात। यावरून सुनावणीचे थेट प्रक्षेपणही केले जाते. युट्युब चॅनल हॅक केल्यानंतर सुप्रीम कोर्टाशी निगडीत सगळ्या वेबसाईटबाबत सतर्कता बाळगण्यात येत आहे.

सुप्रीम कोर्टाचे युट्युब चॅनल नेमके कुठून हॅक केले गेले आहे याचा शोध लावला जात आहे. आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणाही या हल्ल्यामुळे सतर्क झाल्या असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. तपासानंतरच हा हल्ला कुठून आणि कोणी केला याचा माग लागू शकेल.

यापूर्वी सुप्रीम कोर्टाची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. 2018 साली सुप्रीम कोर्टाची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. त्यावेळी हॅकर कोण होते आणि त्यांनी कुठून बसून ही वेबसाईट हॅक केली होती हे कळू शकलं नव्हतं.

SL/ML/SL

20 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *