ऑक्टोबर महिन्यात अशी घ्या काळजी
ऑक्टोबर महिना उजाडताच थंडीसोबत कडाक्याच्या उन्हाचा पारा चढलेला असतो. त्यामुळे आपल्या त्वचेबरोबर शरीराचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर ऑक्टोबर हिट सुसह्य होऊ शकते. या हिटपासून वाचविण्यासाठी करायला सोपे असे घरगुती उपाय करता येईल. ते करून तुम्ही या महिन्यात फिट राहू शकता.
-भरपूर पाणी प्या.
-नैसर्गिक फळांचा रस, कोकम, आवळा सरबत, नारळ पाणी, ताक, लिंबू याचे सेवन करा.
-काकडी, खरबूज, टोमॅटो इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेल्या फळभाज्या खा.
-शरीराला हायड्रेट ठेवा.
-उन्हात जाताना चेहरा रूमालाने झाका. सनस्क्रीनचा वापर आवर्जून करा.
-त्वचा आणि केस उष्णतेपासून वाचवण्यासाठी डोक्याभोवती स्कार्फ गुंडाळा
-सुती कपडे घाला, किंवा हलक्या रंगाचे कपडे निवडा.