बिहारचे ‘सिंघम’ अशी ओळख असणाऱ्या मराठी IPS चा तडकाफडकी राजीनामा

 बिहारचे ‘सिंघम’ अशी ओळख असणाऱ्या मराठी IPS चा तडकाफडकी राजीनामा

पटणा, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहार केडरचे मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील माहिती शिवदीप लांडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. शिवदीप लांडे यांनी जवळपास १८ वर्ष पोलीस खात्यात सेवा केली आहे. शिवदीप लांडे यांना बिहारमधील सिंघम म्हणून ओळखलं जातं. शिवदीप लांडे यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.राजीनाम्याचे नेमके कारण समोर आले नसल्याने ते आता बिहारच्या राजकारणात प्रवेश करणार का अशा चर्चाही रंगत आहेतय

शिवदीप लांडे यांनी याबाबतच्या Facebook पोस्ट मध्ये लिहिले आहे की, “जय हिंद! माझा प्रिय बिहार, गेली १८ वर्षे शासकीय पदावर सेवा दिल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. माझ्या सरकारी नोकरीच्या कार्यकाळात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे. परंतु, मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार माझे कार्यस्थान असेल”, असं शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दोन आठवड्यांपूर्वी लांडे यांनी पूर्णियाच्या IG पदाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर लगेचच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. तिरहुत सारख्या मोठ्या भागातून पूर्णियाला पाठवल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. राजीनाम्यानंतर बिहारमध्येच राहण्याचा त्यांचा विचार असून विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या तिकिटावर ते पाटणा शहरातून २०२५ ची विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे.

SL/ML/SL
19 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *