नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा…

 नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा…

नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य रेल्वे च्या मार्गावरील कोल्हापूर- पुणे, पुणे- हुबळी आणि नागपूर- सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या उद्घाटन विशेष ट्रेनला आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथून हिरवा झेंडा दाखविला… नागपुरातही मध्य रेल्वे तर्फे नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सी पी राधाकृष्णन , मध्य रेल्वे चे नागपुर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचा हस्ते नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवी झेंडी दाखऊन रवाना केले. आणि प्रवाशांना हात दाखऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमधे प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या वंदे भारत ट्रेन मध्ये प्रवाशांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या गेल्या आहेत.. सुरक्षेचा दृष्टीने सुद्धा विशेष लक्ष देण्यात आले आहे.

नागपूर – सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार असून नागपूर येथून सायंकाळीं 4 वाजून 15 मिनिटांनी सुटेल आणि सिकंदराबाद येथे त्याच दिवशी रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी पोहोचेल… या ट्रेन मुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून आरामदायी प्रवाशांसह त्यांचा वेळेची मोठी बचत होणार आहे.

ML/ML/SL

16 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *