‘कोल्हापूर-पुणे वंदे भारत’ आजपासून सुरू
कोल्हापूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या अनेक दिवसांपासूनचे कोल्हापूरकरांचे स्वप्न वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. या रेल्वेला आज दुपारी ३ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून
ऑनलाइन हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या कार्यक्रमासाठी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना हे प्रत्यक्ष कोल्हापूर रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. त्यांनी वंदे भारत रेल्वेला कोल्हापुरातून हिरवा झेंडा दाखवला.
खासदार शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. वंदे-भारत कोल्हापुर ते पुणे अशी धावणार आहे. “वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी कोल्हापुरातून सुटेल आणि दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पुणे स्थानकावर पोहोचेल.
प्रत्येक बुधवार, शुक्रवार व रविवारी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी पुण्याहून सुटणारी ही रेल्वे सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी कोल्हापुरात येणार आहे. मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा या स्थानकांवर तिला थांबा आहे.
अशी आहे आसन क्षमता:
एकूण डबे ८ (त्यात ७ चेअर कार आणि एक एक्झिक्युटिव्ह क्लास)
पाच डब्यात : प्रत्येक ७८ आसन
रेल्वे इंजिन जवळच्या दोन्ही डब्यात प्रत्येक ४४ आसन
एक्झिक्युटिव्ह क्लास : ५२ आसन
एकूण आसन क्षमता : ५३० प्रवासी
तिकीट दर : प्रतिव्यक्ती ५६० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ११३५ रु.
सोयी: तिकीट दरातच मिळणार चहा, जेवण, पाणी
ML/ML/SL
16 Sept 2024