सुट्टीच्या दिवशीही होणार वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वैद्यकीय व आयुष अभ्यासक्रमांची समुपदेशन फेरी सुरू आहे. मात्र पुढील काही दिवस सलग सुट्ट्या येत असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश विनाविलंब होऊन प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाो सलग चार दिवस येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेश केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय यापुढील प्रत्येक शनिवारी व रविवारी तसेच राजपत्रित सुट्टीच्या दिवशी कायम असणार आहे. त्यामुळे वैद्यकीय व आयुष अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. वैद्यकीय व आयुष अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी,तसेच विद्यार्थ्यांना प्रवेशादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने येत्या शनिवार व रविवारबरोबरच त्यांना लागून आलेल्या ईद व अनंत चतुर्दशीच्या सुट्टीच्या दिवशी राज्यातील सर्व प्रवेश केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू असेपर्यंत हा निर्णय यापुढील प्रत्येक शनिवारी व रविवारच्या सुट्टीबरोबरच सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कायम असणार आहे.
SL/ML/SL
14 Sept 2024