ह्या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिणाम
मुंबई, दि. १४ (जितेश सावंत ): ह्या वर्षांतील दुसरे आणि शेवटचे चंद्र ग्रहण (Lunar Eclipse) दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असून ग्रहण सकाळी ६.११ मिनिटांनी सुरु होणार असून सकाळी 10:17 मिनिटांनी संपेल. ह्या ग्रहणाचा प्रभाव हा कन्या राशीवर आणि चित्रा नक्षत्रावर जास्त असेल.
हे ग्रहण अंशिक असून ते अमेरिका (America ),युरोप (Europe )तसेच आफ्रिका (Africa) या ठिकाणाहून दिसेल. ग्रहणाचे परिणाम हे दीर्घकालीन असतात. Usually The Eclipse leave its after effects for long duration. वर्षातील हे दुसरे चंद्रग्रहण पितृ पक्षाच्या पहिल्या दिवशी होत आहे.
या काळात जगात असंतोष पसरण्याची शक्यता आहे. कामगार आणि मालक यांच्यातील संघर्ष वाढेल. जगात /देशात राजकारणात मोठ्या भानगडी उत्पन्न झाल्याने अस्वथता वाढेल. देशाची शांतता भंग पावेल, युद्धयजन्य परिस्थिती तसेच विनाशकारी घटना घडतील. दवाखाने,इस्पितळे,तुरुंग या संबंधित काही प्रकरणे तसेच असमाधानता निर्माण होईल.
जगात/देशात संप पुकारले जातील, संपामुळे जाळपोळ तसेच तोडमोड होण्याची शक्यता. आरोग्याच्या/रोगराई (स्पर्शजन्य/संसर्गजन्य) समस्या उत्पन्न होतील. भयंकर रोगाच्या साथी उदभवतील. बेकारीचे प्रमाण वाढेल आर्थिक समस्या /महागाई मोठ्या प्रमाणांत वाढेल. आर्थिक घोटाळे उघडकीस येईल.
सैन्यात असंतोष पसरेल. परदेशासंबंधी कटकटी तथा भानगडी निर्माण होतील. अपघाताचे प्रमाण वाढेल.
रेल्वेचे यांत्रिक बिघाडामुळे मोठे अपघात घडतील. भूकंपाचे धक्के बसतील. सशस्त्र बल तसेच सैन्यात हिंसा किंवा संघर्ष खास करून नौसेनेत( अग्निकांड)
राजकीय परिणाम
पक्षांमधील मतभेद तीव्र होतील. दुही/असंतोष वाढेल. राजकारणात मोठ्या प्रमाणात भानगडी निर्माण होतील. राजकीय /सत्ताधारी व्यक्तीच्या मृत्यूचे योग. तरुण तसेच खेळाडूंना मोठी पदे किंवा निवडणुकीचे तिकीट मिळेल. खेळाडू तसेच कलाकारांवर कायदेशीर कारवाईची शक्यता.
राजकारणी खास करून सत्ताधारी पक्षातील व्यक्तींना अतिरेक्यांपासून धोका. हा काळ सत्ताधाऱ्यांना त्रासदायक. काही राज्यकर्त्यांना अपमान सहन करावा लागेल तसेच नाचक्की होईल. सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामधील विरोध मोठ्या प्रमाणात वाढेल. मोठी बंड तसेच दुफळी माजेल. राजकीय लोक आजारी पडतील तसेच त्यांना तुरुंगवास घडण्याची शक्यता. किंवा अपहरणाची शक्यता. सरकारसाठी अत्यंत त्रासदायक ठरेल.
सामाजिक परिणाम
कारखानदार ,डॉक्टर , इंजिनिअर यांचा गौरव होईल. स्मगलिंग,चोरीचा माल ने आण करणे प्रकार वाढतील. देशद्रोही तसेच परकीय कारवाया वाढतील. सरहद्दीवरील प्रदेशांना त्रासदायक. विघातक भानगडी उत्पन्न होतील. शिक्षणसंस्था, वृत्तपत्रे,मासिके यांना त्रासदायक काळ, वाङ्ममय प्रकाशनात विघ्ने येण्याची शक्यता. चांगल्या लेखकांचे मृत्यू होण्याची शक्यता.
जगात/देशात दंगेधोपे/अत्याचार/खून तसेच गुन्ह्यांत वृद्धी होताना दिसेल. जातीयवाद वाढेल. तीर्थयात्रा तसेच उत्सवात अपघात होण्याची शक्यता. धर्मसंमेलनात किंवा त्यासंबंधी वादविवाद,आगीचे प्रकार. सामूहिक दुर्घटना घडतील. विमानसेवेत गडबड तसेच अपघाताची शक्यता. नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास तसेच पिकांचे नुकसान होण्याची शक्यता . मंदिरे /हॉस्पिटल/यांच्यासाठी प्रतिकूल काळ
धर्मप्रमुख /प्रतिष्ठित व्यक्ती /पक्षप्रमुख यांच्यावर आरोप होतील. ट्रस्ट मध्ये ट्रस्टीचे वादविवाद होतील.शास्त्रज्ञ ,
धार्मिक चळवळीचे पुरस्कर्ते, वकील,न्यायाधीश, बॅरिस्टर तसेच राजकारणी तसेच अधिकारी वर्ग यांच्या करता प्रतिकूल मृत्यूची शक्यता. लहान मुले ,राजघराण्यातील, तसेच उच्च वर्गातील माणसांचे मृत्यू होतील. लहान मुलांचे अपहरण तसेच घृणास्पद गुन्हे घडतील. लहान मुलांची गुन्हेगारी वाढल्याने शिक्षा तसेच तुरुंगवास. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता. ( अकस्मात काही नियम बदलल्याने ) पायासंबंधित दुखणी वाढतील (ankles) आणि (calves). धार्मिक तथा राजकीय प्रश्नांमुळे अस्वथता पसरेल.
हवेतील प्रदूषण वाढेल. न्यायालयात अत्यंत भानगडीचीचे खटले याच दरम्यान येतील.समुद्रात /किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वादळे तसेचअपघात होतील.जहाजांचे अपघात होतील. घटस्फोटाचे प्रकार तसेच अनीतीचा गोष्टी बाहेर पडून मोठा बभ्रा होईल. स्त्रियांना भूल देऊन अपहरण होतील. घरगुती जीवनात तणाव वाढेल.गर्भपात वाढतील. सौराष्ट्र /बंगाल/बांगलादेशातील स्त्रियांना त्रासदायक. स्त्री कलाकारांचे नवीन चांगले सिनेमे येतील. कलाकारांच्या स्वातंत्र्यावर बाधा निर्माण होण्याची शक्यता. बनावट नोटांचे प्रकार उघडकीस येतील. रेव्ह पार्टीच्या घटना उघडकीस येईल. मोठ्या कलाकाराच्या मृत्यूची शक्यता.
पासपोर्ट यासंबंधित काही बदलाची शक्यता.
आर्थिक परिणाम:
या काळात सोने/चांदी/तांबे /पितळ/ ज्वारी /बाजरी यात सुरुवातीला अस्थिरता निर्माण होईल परंतू नंतर तेजी होईल.
महाराष्ट्र राज्यावरील परिणाम
ग्रहणाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता जाणवेल. राज्याच्या पत्रिकेत धनु लग्न असल्यामुळे, सत्ताधारी पक्षांतर्गत तणाव वाढेल. घटक पक्षांमध्ये मतभेद तीव्र होतील, ज्यामुळे सरकारवर दबाव येईल.दशमस्थानातील ग्रहण हे सत्ताधारी पक्षाच्या कटकटी वाढवतील. सत्ताधारी पक्षातील घटक पक्षांचे वाद विकोपास जातील. महाविकास आघाडीकरिता काळ चांगला असला तरी, नेत्यांनी आपली विधाने सावधपणे करावीत. राज्याच्या दशमस्थानात केतू असल्याने मोठी अस्थिरता निवडणूक काळात देखील जाणवेल. निवडणुकीनंतर देखील काही काळ ही अस्थिरता पाहावयास मिळेल.
नूतन वर्ष / देशात कोणाची सत्ता येईल/सूर्यग्रहण /राहूकेतूपरिवर्तन/गुरुचा राशी बदल/ तसेच महाराष्ट्र राज्यातील अनपेक्षित घडामोडींबद्दल ह्या अगोदर मी माझे मत मांडले आहे.
त्याच्या लिंक खालील प्रमाणे
https://mmcnewsnetwork.com/new-year-2/
https://mmcnewsnetwork.com/is-baat-kiski/
https://mmcnewsnetwork.com/what-astrology-says-about-unexpected-political-events/
https://mmcnewsnetwork.com/jupiter-transit-in-taurus/
https://mmcnewsnetwork.com/rahu-ketu-will-transform-lets-know-your-horoscope/
https://mmcnewsnetwork.com/sun-eclipse/
लेखक
के. पी. विशारद , नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant) शेअरबाजार
(StockMarket)/सायबरकायदा(cyberlaw)
तज्ञ आहेत.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant