महाराष्ट्रात ४७०० घरात सौर ऊर्जा
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात ४७१४ घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जातेय. पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील ३१,००० घरगुती सौरऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत. यापैकी चार हजार ७१४ ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात. त्याशिवाय राज्यात आणखी ८७५ अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत. प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे १२० ते ३६० युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे. यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या घरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिलीय .अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून 25 वर्षे मोफत वीज मिळणार आहे. पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गाव खेड्यातील घरं उजळून निघालीत.
https://youtu.be/UdAbvynURB8
ML/ML/PGB 13 Sep 2024