सांगली, कोल्हापूरसाठी दोन स्वतंत्र ‘वंदे भारत’ एक्सप्रेस
कोल्हापूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हुबळी- पुणे व्हाया मिरज- सांगली अशी वंदेभारत एक्सप्रेस सुरू होत असतानाच कोल्हापूर- पुणे अशी आणखी एक वंदेभारत एक्सप्रेस स्वतंत्रपणे सुरू केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना एकप्रकारे दिलासा मिळणार आहे, हुबळी – पुणे एक्सप्रेस मिरज मार्गे कोल्हापूरला जाऊन यायला दोन दासापेक्षा अधिक वेळ लागतो. त्यामुळे सदर प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी कोल्हापूर ते पुणे अशी वंदे भारत एक्सप्रेस स्वतंत्रपणे सुरू केली जाणार आहे.
याभागातून गणेशोत्सवाच्या काळातच दोन्ही गाड्या 16 सप्टेंबर 2024 पासून सुरू केल्या जाणार आहेत. दक्षिण भारतातून येणाऱ्या आणि पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. हुबळी ते पुणे या एका वंदे भारत एक्सप्रेसने लोकांची गरज भागणारी नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रथम हुबळी या गाडीसाठी असणारा सांगली येथील थांबा रद्द करण्यात आला, त्यावेळी हा विषय पुढे आला. सांगली ते पुणे या मार्गावर किरकोळ व्यापारी नोकरदार आणि सामान्य लोकांची दैनंदिन येजा मोठी आहे. त्यामुळे या मार्गावर नियमित सामान्य गाड्यांची संख्या वाढवावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
ML/ML/SL
13 Sept. 2024