मायक्रोसॉफ्टची पुण्यातील मोठी गुंतवणूक; 520 कोटींमध्ये 16 एकर जागा खरेदी

 मायक्रोसॉफ्टची पुण्यातील मोठी गुंतवणूक; 520 कोटींमध्ये 16 एकर जागा खरेदी

मायक्रोसॉफ्टने भारतात आपल्या विस्तारासाठी मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीने पुण्यातील हिंजवडी परिसरात तब्बल 520 कोटी रुपयांत 16 एकर जागा खरेदी केली आहे. या जागेवर मायक्रोसॉफ्टचा नवा प्रकल्प उभा राहणार असून, यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हिंजवडी आयटी हबमुळे पुण्याची ओळख जगभरात विस्तारत असून, मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक दिग्गज कंपनीच्या गुंतवणुकीमुळे या क्षेत्राचा विकास आणखी वेगाने होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील आयटी उद्योगात नवीन क्रांती घडेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *