मिठागरांवर इमारतींची बांधकामे झाल्यास पूर्व उपनगराला धोका
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धारावीतील अपात्र प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्राने मिठागरांच्या जमिनी राज्य सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिठागरांच्या जमिनीचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. मिठागरांवर बांधकामे झाल्यास पूर्व उपनगराला धोका निर्माण होऊ शकतो, याकडे पर्यावरण तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
२६ जुलैच्या महाप्रलयानंतर भविष्यातील उपाययोजनांसाठी सरकारने डॉ. माधव चितळे समितीची नियुक्ती केली होती. या समितीने आपल्या अहवालात पर्यावरणाच्या दृष्टीने खार जमिनींचे महत्त्व विशद केले होते. किनारी क्षेत्रे, खारफुटीच्या जमिनी, मोकळ्या जमिनी, पाणथळ जागा, उद्याने राखीव ठेवावीत. ही क्षेत्रे नैसर्गिक बफर झोन म्हणून काम करतात, असे म्हटले आहे.
PGB/ML/PGB
6 Sep 2024