भारतीय नौदलात पायलट, नौदल अधिकारी यासह 250 पदांसाठी भरती
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत भरती अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये पायलट आणि नेव्हल ऑफिसरसह 250 पदांवर भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/B.Tech/MSc/MCA/MBA पदवी 60% गुणांसह आवश्यक.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 10वी आणि 12वी मध्ये इंग्रजी विषयात 60% गुण असणे आवश्यक आहे.
- पदानुसार विविध पदव्या वैध असतील.
वयोमर्यादा:
- पायलट: 18-23 वर्षे.
- इतर सर्व पदांसाठी वयोमर्यादा वेगळी आहे, ही माहिती अधिसूचनेत दिली आहे.
निवड प्रक्रिया:
- पात्रता आणि पदवीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल आणि गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
- गुणवत्तेच्या आधारावर वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.
- निवडलेल्या उमेदवाराला सुरुवातीला तीन वर्षांच्या प्रोबेशन कालावधीवर ठेवण्यात येईल.
यासाठी अर्ज 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतील आणि 29 सप्टेंबर 2024 पर्यंत भरले जातील. भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन उमेदवार ऑनलाइन फॉर्म भरू शकतात.
PGB/ML/PGB
5 Sep 2024