वांद्रे-कुर्ला दरम्यान धावणार पॉड टॅक्सी

मुंबईत वाहतुकीचे जाळे विस्तीर्ण आहे. बस, टॅक्सी, रिक्षा सुविधा आहेच. पण, रेल्वे मार्गाने तर खूपच सोय झाली आहे. शिवाय मेट्रो, मोनो ट्रेनमुळेही खूप सोय झाली आहे मात्र, मुंबईकरांचा प्रवास अजून सुखकर व्हावा यासाठी ‘पॉड टॅक्सी’ची सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही पॉड टॅक्सीची सेवा प्रवाशांना वांद्रे-कुर्ला मार्गासाठी वापरता येणार आहे. कुर्ला-बीकेसी- वांद्रे या भागात गेल्या काही वर्षात अनेक ऑफिसेस सुरू झाली आहेत. अनेक आयटी कंपनीपासून ते अनेक मीडिया हाऊस येथे स्थापन झालेले आहे. दररोज, अनेक कामगारी वर्ग येथे येत असतो. त्यामुळे स्टेशनपासून येथे येणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होतात. मात्र, यासाठी सरकारने पॉड टॅक्सी या उपाय शोधून काढला आहे.