पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचा IPO येणार, १० ते १२ सप्टेंबर दरम्यान सबस्क्रिप्शन घेता येणार
राज्यातील प्रसिद्ध पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहेत. या आयपीओसाठी प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ ११०० कोटी रुपयांचा असणार असून यासाठी ४५६ ते ४८० रुपयांचा प्राइज बँड निश्चित करण्यात आलाय. पुढील आठवड्यात १० सप्टेंबर रोजी हा इश्यू सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. पण ९ सप्टेंबरपासून तो एंकर गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. आयपीओ अंतर्गत शेअर्सचे वाटप १३ सप्टेंबर रोजी केले जाणार आहे. त्यानंतर १७ सप्टेंबरला बीएसई आणि एनएसईवर शेअर लिस्ट होतील.