तृतीयपंथींसाठी KEM रुग्णालयात विशेष ओपीडी
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयात ‘सखी चार चौघी’च्या सहकायनि तृतीयपंथी समुदायासाठी विशेष OPD सुरू करण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ही विशेष सेवा युरोलॉजी विभागातील बहुमजली इमारतीच्या आठव्या मजल्यावर दर शनिवारी दुपारी ३ वाजता सुरु होईल.
भारतातील तृतीयपंथी समुदायाला विविध अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या आव्हानांपैकी यूरोलॉजिकल आरोग्य समस्या विशेषतः गंभीर असतात. विशेषतः लिंगसंबंधी शस्त्रक्रिया करणाऱ्यांसाठी किंवा करण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया आव्हानात्मक असते. तृतीयपंथींच्या शस्त्रक्रियेनंतर मूत्रमार्गात संक्रमण, मूत्रमार्गातील गुंतागुंत आणि लघवीशी संबंधित समस्या उद्भवातत. मूत्रमार्गात कडकपणा, फिस्टुला आणि संसर्गचा धोका असतो.
रुग्णालयात तृतीयपंथीसाठी दर शनिवारी ही ओपीडी असेल. यासंदर्भातील नुकतीच गौरी सावंत आणि तृतीयपंथी समुदायातील सदस्यांसोबत बैठक झाली. त्यांना लागणाऱ्या सुविधा देण्यासाठी प्रशासन म्हणून प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय यांनी दिली.
SL/ML/SL
1 Sept 2024