पैठण येथील जायकवाडी धरण 85 टक्के भरले

छ. संभाजीनगर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाची पाणी पातळी हि 85 टक्क्यावर पहोचली असून सध्या जायकवाडी धरणात 50 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. माजलगाव धरणासाठी जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून २०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार आहे.
त्यामुळे गोदावरी नदीकाठासह कालवा परिसरातील रहिवाशी, पशुपालक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ML/ML/SL
1 Sept 2024