वडापाव खाण्याच्या नादात गमावले १४ लाखांचे दागिने

 वडापाव खाण्याच्या नादात गमावले १४ लाखांचे दागिने

पुणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचबरोबर भुरट्या चोरांचाही सुळसुळाट झाला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना चोरांचा उपद्रव होत आहे. यामुळे आता नागरिकांनी सावधपणा बाळगणे गरजेचे ठरले आहे. आज पुण्यातून एक चमत्कारिक घटना समोर आली आहे. बँकेतून सोने काढून परतणाऱ्या दांपत्यावर पाळत ठेवणाऱ्या चोरट्यांनी १४ लाखांचे दागिने लंपास केले आहेत. याला कारण ठरला आहे. या दांपत्याला सोने घेऊन घरी परतताना झालेला वडापाव खाण्याचा मोह. पुण्यात एका जोडप्याला वडापाव खाण्यासाठी थांबणं फारच महागात पडलं. ते वडापाव खाण्यासाठी थांबले असता चोराने त्यांची दागिन्यांची पिशवी लंपास केली. या पिशवीत 195 ग्रॅम सोन होतं, ज्याची किंमत जवळपास 14 लाख आहे. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांजरीमध्ये राहणारे दशरथ धामणे आणि त्यांच्या पत्नी जयश्री धामणे यांनी बँकेत तारण ठेवलेलं 195 ग्रॅम सोनं सोडवून आणलं होतं. घऱी परतत असताना त्यांनी दागिन्यांची पिशवी स्कूटरच्या पुढच्या बाजूला लटकवली होती. रस्त्यात ते नातवंडांना वडापाव घेण्यासाठी हडपसर मधील रोहित वडेवालेसमोर थांबले होते. दशरथ धामणे वडापाव घ्यायला गेले असता त्यांच्या पत्नी गाडीपाशी उभ्या होत्या. तेवढ्यात एका अनोळखी व्यक्तीने संधी साधत त्यांची दागिन्यांची पिशवी लंपास केला.

SL/ML/SL

31 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *