सन्मान बचत प्रमाणपत्राचा 16 हजार जणींना लाभ
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२३-२४ अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान बचतपत्र योजना’ जाहीर केली होती. या योजनेचा ३१ जुलैपर्यंत नाशिक शहरातील सुमारे १६ हजार ४५१ महिलांनी लाभ घेतल्याची माहिती जिल्हा टपाल कार्यालयातील वरिष्ठ टपाल अधिकारी गोपाल पाटील यांनी दिली. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत ही योजना सर्व वयोगटांतील महिला व मुलींसाठी लागू असणार आहे. ज्या महिलांना लिहिता, वाचता येत नाही अशा महिलांना जिल्हा टपाल कार्यालयामधून अर्ज भरून मिळतो आणि योजनेबद्दल माहिती समाजावून सांगितली जाते. महिला सन्मान बचतपत्र काढण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो कागदपत्र आवश्यक असते. योजना घेतल्यानंतर तीन महिन्यांनी रक्कम खात्यावर टाकता येते.
एक वर्षानंतर आपत्कालीन परिस्थितीत ४० टक्के इतकी रक्कम काढता येते.असा मिळतो परतावापोस्टात एफडीचा व्याजदर ६.८ टक्के इतका आहे. महिला सन्मान बचतपत्र योजनेत ७.५ टक्के व्याजदरानुसार २ लाख रुपये दोन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास ३२ हजार ४४ रुपये इतका परतावा मिळतो. १ लाखाची गुंतवणूक केल्यास १६ हजार २२ रुपये इतक्या व्याजासह परतावा मिळतो तर ५० हजारांची गुंतवणूक केल्यास ८ हजार ११ रुपये व्याजासह परतावा मिळतो.
PGB/ML/PGB
29 Aug 2024