नात्याला काळिमा! बदलापुरमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर वडिलांनी केला अत्याचार
कोलकाता येथील बलात्काराचे प्रकरण आणि बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने केलेले अत्याचाराचे प्रकरण उघड झाल्यापासून राज्यात मुली आणि महिलांविरोधात झालेल्या गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच बदलापूरमधूनच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापुरमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी अनेकदा लैंगिक अत्याचार केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, वडिल आपल्या अल्पवयीन मुलीला अनेकदा मारहाण करायचे आणि तिच्यावर अनेकवेळा लैगिंक अत्याचार करायचे. ही घटना 22 ऑगस्ट रोजी घडली असून अल्पवयीन मुलगी घाबरून घरातून पळून गेली होती. परंतु नंतर परत आली. सोमवारी तिने पोलिसात जाऊन वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी वडिलांवर कलम 118 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.