४० प्रवाशांना घेऊन नेपाळला जाणारी बस नदीत कोसळली, बचावकार्य सुरु

 ४० प्रवाशांना घेऊन नेपाळला जाणारी बस नदीत कोसळली, बचावकार्य सुरु

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस शुक्रवारी दुपारी मार्स्यांगडी नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही बस उत्तर प्रदेश नंबर UP FT 7623 असलेली असून, पोखराहून काठमांडूला जात होती. बसमध्ये 40 प्रवासी होते, ज्यापैकी बहुतेक भारतीय होते. या अपघाताने नेपाळ आणि भारतातील प्रवाशांमध्ये चिंता आणि दुःखाची लाट उसळली आहे. या ठिकाणी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत अनेकांना जलसमाधी मिळाली असण्याची शक्यता आहे. ही बस उत्तर प्रदेशातली होती. ती पोखराहून काठमांडूच्या दिशेने बस चालली होती त्याचवेळी हा अपघात झाला. या प्रकरणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे

PGB/ML/PGB
23 Aug 2024

incognito@trimitiy.com

http://mmcnewsnetwork.com

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *