राजकारण दिल्लीतले आणि राज्यातले
मुंबई दि २९– देशात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर नवीन सरकारची पहिली बहुमत चाचणी लोकसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने झाली. यात सत्तारूढ आघाडीने आवाजी मतदानाने सहज विजय मिळवला तर विरोधकांची इंडिया आघाडी विखुरलेली दिसून आली. मनमोहनसिंग सरकारने घेतलेले निर्णय फाडून टाकणाऱ्या आणि आजवर कोणतीही घटनात्मक जबाबदारी न स्वीकारणाऱ्या राहुल गांधी यांच्या कडे आता लोकसभेत विरोधी पक्षनेते पद आले आहे, ते काय करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इकडे राज्यात महाविकास आघाडीत आता मुख्यमंत्री पदाची शर्यत लागली आहे तर दुसरीकडे लोकसभेत सपाटून हरल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी म्हणून सत्तारूढ आघाडीने घोषणांचा पाऊस पाडणारे अतिरिक्त बजेट काल सादर केले. आज वर्तमान च्या व्हिडिओ मध्ये या सगळ्याचा परामर्श घेतला आहे. तेव्हा व्हिडिओ पहा लाईक करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब ही करा…..