आषाढी एकादशी विशेष, संतसाहित्याची अक्षय वारी..!
आषाढी एकादशीची वारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. लक्षावधी वारकरी शेकडो मैल चालत पंढरीच्या वेशीवर दाखल झाले आहेत. ज्ञानोबा- तुकारामाच्या गजरात पंढरपूरचा आसमंत भरून गेला आहे. महाराष्ट्राचे धार्मिक आणि अध्यात्मिक संचित समृद्ध करणाऱ्या संत कवींनी विपुल काव्य निर्मिती करून आपल्या मायबोली मराठीचे दालनही समृद्ध केले आहे. सर्वसामान्यांना अगदी सोप्या शब्दांमध्ये जीवनरहस्य सांगणाऱ्या सर्वसमावेशक अशा संतसाहित्याने मराठी भाषेला अधिक वैभवशाली केले आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने ‘वर्तमान’ व्हिडीओमध्ये आपण संत साहित्याचे मराठी भाषेच्या विकासातील योगदान याविषयी कवी,प्रा. अशोक बागवे यांच्याशी चर्चा करत आहोत.
हा विशेष एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडीओला Like करा. आणि असेच नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी MMC News Network ला Subscribe करा.