फडणवीस , अर्थसंकल्प आणि वाद
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसे राजकीय आरोप आणि प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत. सध्या अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद विवाद ताजा आहे, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला नेमके काय आणि किती मिळाले यावरही जोरदार आरोप प्रत्यारोप झडत आहेत. दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वित्त विभागाने आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. या सगळ्यात सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये जायला असलेली बंदी मागे घेण्यात आल्याचा विषय फार वाद न होताच मागे पडला आहे. या सगळ्या विषयांवर आपण आजच्या ‘ वर्तमान ‘ च्या या व्हिडिओत चर्चा केली आहे. तेव्हा तो पहा लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब ही अवश्य करा.