100 हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा.

100 हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा.
छ संभाजीनगर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आज खिचडी ऐवजी पोष्टिक आहार म्हणून दिलेल्या बिस्किटातून शंभरावर विद्यार्थ्याना विषबाधा झाली. बिस्किटे खाल्ल्या नंतर अनेक विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होऊन त्या विद्यार्थ्याना ताप आला.
विद्यार्थ्यांची तब्बेत बिघडल्याने शिक्षक आणि पालकांनी 120 विद्यार्थ्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असून घाबरण्यसारखे काही कारण नसल्याचे डॉक्टरानी सांगितले आहे.
ML/ML/PGB
17 Aug 2024