अर्शद नदीमच्या भालाफेकीमुळे पाकिस्तानने जिंकली पहिल्यांदाच ऑलिम्पिक, मुख्यमंत्र्यांनी दिले १० कोटी
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेतील भालाफेक प्रकारात सुवर्ण पदक पाकिस्तानच्या अर्शद नदीमने जिंकले. त्यामुळे तो ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पाकिस्तानचा पहिलाच खेळाडू ठरला. त्याच्यासाठी अनेकांनी बक्षीसेही घोषित केली आहेत. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनीही नदीमच्या गावी जाऊन त्याला मोठे बक्षीस दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला १० कोटी रूपये आणि ९२.९७ क्रमांकाची होंडा कार दिली आहे.