झारखंडमध्ये सापडले बांगलादेशी गिधाड
रांची, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशातील राजकीय स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बांगलादेशमधील नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी देशातील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून शपथ घेतली आहे. मात्र त्यानंतरही तेथील लष्कर आणि प्रशासन आंदोलकांच्या उत्पात थांबवू शकलेले नाही. तेथील अल्पसंख्यांक हिंदू समाजाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या साऱ्या गंभीर पार्श्वभूमीवर आज भारतात बांगलादेशातून आलेले इलेक्ट्राॅनिक चिप आणि मेटॅलिक रिंग लावलेले गिधाड आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. हे गिधाड नक्की कोणत्या उद्देशाने पाठवण्यात आले आहे, याचा शोध यंत्रणांकडून घेण्यात येत आहे.
झारखंडच्या हजारीबागमध्ये सापडलेले हे गिधाड सध्या चर्चेचा विषय बनले आहे. विष्णुगड येथील कोनार धरणातून बांगलादेशातील एक गिधाड पकडण्यात आले आहे. त्याच्या पंखावर एक यंत्र असून त्यावर बांगलादेशची राजधानी ढाकाचे नाव आणि क्रमांक कोरलेला आहे. सध्या या गिधाडाला विष्णुगडमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. गिधाडाला लावलेली चिप आणि मेटॅलिक रिंगची सध्या तपासणी केली जात आहे. येथील एसपी अरविंद सिंह यांनी सांगितले की, पकडलेल्या गिधाडाची माहिती मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या बाबतचा अहवाल देखील मागवला आहे.
येथे सेव्ह एशियन व्हल्चर्स फ्रॉम एक्सटीन्क्शनचे सदस्य डॉ. सत्यप्रकाश यांनी सांगितले की, हे गिधाड लांबचा प्रवास करून हजारीबागमध्ये पोहोचले आहे. हे गिधाड थकलेले आहे तसेच आजारी देखील आहे. हे गिधाड आजारी पडण्यामागे दोन कारणे असू शकतात. एकतर त्याला वाटेत अन्न मिळाले नसावे किंवा त्याने डायक्लोफेनयुक्त मांस खाल्ले असावे. हजारीबाग पूर्व वन विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, गिधाडावर बांगलादेशी सोलर रेडिओ कॉलर बसवण्यात आले आहे.
विष्णुगढ येथील कोनार धरणातून बांगलादेशातील एक गिधाड पकडण्यात आले आहे. त्याच्या पंखावर एक धातूची अंगठी व एक सोलर यंत्र बसवण्यात आले आहे. या यंत्रावर बांगलादेशची राजधानी ढाकाचे नाव आणि क्रमांक कोरलेला आहे. हजारीबाग पूर्व वनविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे गिधाड वन्य प्राणी संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत शेड्यूल-१ च्या श्रेणीत येते. त्याच्या अंगावर बांगलादेशी सौर रेडिओ कॉलर बसवण्यात आली आहे.
या प्रकरणी गिधाड तज्ज्ञांशी संपर्क साधला असता हे पांढरे आणि राखाडी रंगाचे गिधाड आहे. हजारीबाग पूर्व वनविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे गिधाड वन्य प्राणी संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत शेड्यूल-१ च्या श्रेणीत येते. त्यांनी सांगितले की बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीने (BNSHS) दिलेल्या या माहितीनुसार या पक्ष्याचे रेडिओ टॅगिंग रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स (RSPB) यूकेने केले होते.
गिधाडांची कमी होणारी संख्या पाहता या गिधाडाला जियो टॅग केले असावे. ज्याचा उद्देश या नामशेष होणाऱ्या या पक्ष्याचे सतत निरीक्षण करणे हा आहे. या पक्ष्याचे टॅगिंग ढाकास्थित आरएसपीबी यूकेच्या टीमने केले आहे, ज्यामुळे त्याच्या पंजावरील अंगठीवर ढाका कोरलेला आहे. BAHS ने विभागासोबत शेअर केलेल्या माहितीनुसार, १५ मे २०२४ रोजी या पक्ष्याला टॅग लावले होते. ०८ ऑगस्ट २०२४ रोजी हजारीबाग जिल्ह्यातील कोनार धरणावर आले. हजारीबागपर्यंत पोहोचण्यापूर्वी या पक्ष्याने एकूण १२१४ किलोमीटरचे अंतर कापले आहे. एकूण ४५ दिवसांच्या प्रवासानंतर सोमवारी हे गिधाड झारखंडमधील हजारीबागला पोहोचले.
बांगलादेशातील राजकीय तणाव आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात बांगलादेशातून आलेल्या एका उपकरणासह गिधाड सापडल्यानंतर लोकांमध्ये खळबळ उडाली होती. चर्चा सुरू झाली आहे. लोकांना हेरगिरीचा संशय आला. या गिधाडाच्या पायांवर अंगठी आढळली. सोबट एक यंत्र आढळल्याने हा संशय आणखी वाढला. मात्र, या पक्षाची तपासणी केल्यावर ही शक्यता दूर झाली.
ML/ML/SL
13 August 2024