मॅकडोनाल्डने आणला श्रावण स्पेशल बर्गर
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतासारख्या खंडप्राय देशात वर्षभर विविध सण उत्सवांची रेलचेल सुरू असते. यानिमित्ताने विविध उपास, व्रतवैकल्य केली जातात. यामध्ये बहुतांश वेळा कांदा-लसूण वर्ज समजले जाते. भारतीय बाजारपेठांमध्ये हातपाय पसरू लागलेल्या बहुराष्ट्रीय फास्टफूड कंपन्या आता या स्थानिक प्रथा लक्षात घेऊन आपल्या उत्पादनांमध्ये आवश्यक बदल करू लागल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या श्रावण मासानिमित्ताने सात्विक आहाराला महत्त्व दिले जाते. ते लक्षात घेऊन मॅकडोनाल्ड्स इंडियाने आता श्रावण महिन्यासाठी कांदा आणि लसूण विरहित (नो कांदा, नो लसूण) बर्गर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅकडॉनल्ड सारख्या कंपनीने शाकाहारी होण्याचा निर्णय घ्यावा याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे .मॅक चीज बर्गर आणि मॅक आलू टिक्की या दोन पदार्थांमध्ये कांदा आणि लसूण नसेल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.मात्र, मॅकडोनाल्डच्या श्रावण स्पेशल बर्गरवर सोशल मीडियावर टीका होत आहे. श्रावणात फास्ट फूड खाणे हे त्या पवित्र महिन्याच्या भावनेच्या विरोधात आहे. श्रावण महिन्याला हिंदू संस्कृतीमध्ये मोठे महत्त्व आहे.
SL/ML/SL
12 August 2024