सोयाबीन आणि इतर पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव.
जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील काही दिवसांपासून असलेला ढगाळ वातावरणामुळे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन आणि इतर पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने महागडे औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली असून पीक वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचा वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान फवारणीसाठी येणारा खर्च यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका देखील बसत आहे. खरीप हंगामातील पेरण्या झाल्यानंतर पावसाने उघडीप दिली मात्र ढगाळ वातावरण आणि अधून मधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांवर रोग पडत आहे.
ML/ML/PGB
12 Aug 2024