Paris Olympic: भारताला हॉकीमध्ये कांस्यपदक, वीनेश फोगट निवृत्त
पॅरिस, दि.८ (एमएमसी न्यूज नेटवर्क):पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २-१ असा पराभव केला. त्याचबरोबर भारताचे हे एकूण चौथे कांस्यपदक आहे. याशिवाय देशाने ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक ८ सुवर्ण आणि १ रौप्य पदक जिंकले आहे. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते.पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी केवळ काही ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आल्यानंतर आज भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
भारतीयहॉकी संघाने विजय मिळवल्यावर मनप्रीत सिंगने हे कांस्यपदक श्रीजेशला समर्पित केल्याचे सांगितले. कारण श्रीजेशचा हा अखेरचा सामना होता. अखेरच्या सामन्यात श्रीजेशने दमदार कामगिरी केली आणि कांस्यपदक जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे श्रीजेश या पदकाचा खरा हकदार आहे, असे यावेळी मनप्रीतने सांगितले. श्रीजेशने भारतासाठी आतापर्यंत अविस्मरणीय कामगिरी केली आहे. भारतीय हॉकीतील न विसरता येणारे नाव हे श्रीजेशचे नक्कीच असेल. त्यामुळे त्याने आतापर्यंत केलेल्या भारतीय हॉकीच्या सेवेसाठी त्याला हे पदक समर्पित केल्याची भावना सर्वांच्याच मनात होती.
या सामन्यानंतर भारताचा कर्णधार हरमनप्रीत म्हणाला की, ” भारताच्या हॉकी संघात काही खेळाडूंचे जे वय आहे, त्यापेक्षा जास्त वर्षे श्रीजेश हा भारतासाठी हॉकी खेळला आहे. त्यामुळे त्याचे भारतीय हॉकीमधील योगदान हे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे आमच्या सर्वांसाठी हा फारच भावूक क्षण आहे. कारण आमच्या संघातील एक सर्वात महत्वाचा व्यक्ती यापुढे आमच्यबरोबर मैदानात नसेल. पण श्रीजेशने भारतीय हॉकीसाठी जे काही केले आहे, त्यालाच तोडच नाही.” सांगितले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत (८ ऑगस्ट) ४ पदके जिंकली आहेत. चारही कांस्यपदके मिळवली आहेत. मागील तीन कांस्यपदके नेमबाजीत जिंकली आहेत. मनू भाकेरने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये प्रथम कांस्यपदक मिळवले. त्यानंतर मनू भाकेरनेही मिश्र सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगसोबत दुसरे कांस्य मिळवले. यानंतर स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले. आता हॉकीमघ्ये भारताला चौथे कांस्यपदक मिळाले आहे.
SL/ ML/ SL
8 August 2024