ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जोरदार स्वागत

 ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जोरदार स्वागत

पुणेदि.८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेल्या तीन पदकांपैकी एक पदक हे कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे या तरुणाने पटकावले आहे. पॅरिसमधून स्वप्नील आता मायदेशी परतला आहे. यानंतर पुण्यामध्ये त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी स्वप्निलने दगडूशेठ बाप्पाचे दर्शन देखील घेतले.ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर स्वप्नील कुसाळे याने कांस्यपदकाची कमाई करत उत्कृष्ट कामगिरी केली. वैयक्तिक पदक मिळवणारा महाराष्ट्रातील तो दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात परत आला. यावेळी पुणे विमानतळावर स्वप्नीलचे जोरदार स्वागत करण्यात आले.

त्यानंतर स्वप्नीलचे बालेवाडी येथे जंगी स्वागत स्वागत झाले. तसेच स्वप्नीलने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणपती बाप्पा मोरया, असे म्हणत बाप्पाचं दर्शन घेतले. तसेच आरती केली. यावेळी ट्रस्टकडून स्वप्नीलचा सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, आणि पदाधिकारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा मला अभिमान वाटतो. मला माझ्या देशासाठी पदक जिंकण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, असं स्वप्नील कुसाळे याने म्हटलं आहे. एवढ्या वर्षांनी मोठ्या व्यासपीठावर देशासाठी आणि राज्यासाठी पदक जिंकण्याची संधी मला मिळाली, असं म्हणत त्याने कृतज्ञता देखील व्यक्त केली.

स्वप्निल कुसळेची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत मैदान गाजवणाऱ्या स्वप्निलचे संपूर्ण देशभरात कौतुक होत आहे. स्वप्निलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदर मिळवून दिलं आहे तर महाराष्ट्राला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. महाराष्ट्रात ऑलिम्पिक मेडल येण्यासाठी तब्बल 72 वर्षे लागली. पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 मधील समर ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीत ब्राँझ पदक पटकावले होते.

ML/ ML/ SL

8 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *