इलॉन मस्कच्या न्यूरोटेक्नॉलॉजी न्यूरालिंक कंपनीला मोठं यश, मेंदूत चिप बसवण्याची शस्त्रक्रिया यशस्वी
Elon Musk च्या स्टार्टअप न्यूरोटेक्नॉलॉजी न्यूरालिंक कंपनीला मोठं यश मिळालं आहे. Elon Musk च्या न्यूरालिंक कंपनीने ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस डिवाइस दुसऱ्या रुग्णाच्या मेंदूत इम्प्लांट केलं आहे. न्यूरालिंक कंपनीचं हे इंप्लांटेशन पूर्णपणे यशस्वी झालं आहे. न्यूरालिंक कंपनीमुळे आता अर्धांगवायू असलेल्या रुग्णाचा मेंदू डिजिटल डिव्हाइस कंट्रोल करणार आहे.
चिप्समुळे दिव्यांग व्यक्ती विचार करूनच डिव्हाइसवर नियंत्रण करू शकणार आहेत. या डिव्हाइसच्या माध्यमातून मेंदूने कमकुवत असणारी व्यक्ती विचार करू शकते. न्यूरालिंकचे मालक इलाॅन मस्क यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या चिप्सची चाचणी दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी सुरू आहे. पहिल्या रुग्णाने या चिप्सच्या मदतीने व्हिडिओ गेम खेळणे, इंटरनेट वापरणे, सोशल मीडियावर पोस्ट करणे आणि लॅपटॉपवर कर्सर हलविणे शक्य केले आहे.