लाडकी बहीण योजनेचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाची मान्यता

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाडकी बहीण योजना सरकारने लागू केल्यानंतर याला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आले होते. याप्रकरणी हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. लाडकी बहीण योजनेविरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे.लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील चार्टर्ड अकाऊंटंट नावेद मुल्ला यांनी वकील ओवैस पेचकर यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टानं ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता या योजनेचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टानं ही याचिका फेटाळताना याचिकाकर्त्यांना देखील चांगलंच फटकारलं आहे. लाडकी बहिण योजना ही कल्याणकारी योजना आहे, हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही,’ असं निरीक्षण सुनावणीदरम्यान न्यायालयानं नोंदवलं आहे.
TR/ML/PGB
5 Aug 2024