‘विवाह’ विषयावर चीनमधील विद्यापीठात पदवी अभ्यासक्रम

 ‘विवाह’ विषयावर चीनमधील विद्यापीठात पदवी अभ्यासक्रम

बीजिंग,दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): चीनमध्ये जन्मदर आणि विवाहदर कमालीचा कमी झाला आहे. यामुळे चीन सरकार चिंतेत आहे. आता चीनच्या ‘सिव्हिल अफेअर्स’ अर्थात नागरी व्यवहार विद्यापीठाने विवाह-संबंधित उद्योग आणि संस्कृती विकसित करण्यासाठी नवीन पदवीपूर्व ‘विवाह ‘ या विषयावर अभ्यासक्रम तयार केला आहे.पुढील महिन्यात सप्टेंबरपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

बीजिंग येथील ‘सिव्हिल अफेअर्स’ विद्यापीठात सप्टेंबरमध्ये सुरू होणार्‍या या नवीन ‘विवाह ‘ विषयक अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत १२ प्रांतातील ७० पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात कौटुंबिक समुपदेशन,विवाहाचे नियोजन आदी विषयांचा समावेश आहे.
‘विवाह सेवा व व्यवस्थापन’ असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. चीनमध्ये विवाहाबाबत सकारात्मकता वाढावी व कुटुंब संस्था अबाधित राहावी यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. चीनमध्ये कोरोना काळानंतर उशिरा लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. चीनमध्ये नोकर्‍या मिळत नसल्याने व जीवनमानाची खात्री नसल्याने अनेकांचा अविवाहित राहण्याकडे कल वाढत चालला आहे.

SL/ ML/ SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *