सुके बोंबिल फ्राय

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
सुके बोंबिल – १०/१२
लाल मिरच्या – ७/८
कांदा – १
लसूण पाकळ्या – १०/१२
आल – १ छोटा तुकडा
जीरा – १ चमच
मीठ – चवीनुसार
साखर – १ चमच
पाणी – १/४ कप / गरजेनुसार
तेल – २ चमचे / गरजेनुसार
क्रमवार पाककृती:
१. सुके बोंबिल नेहमीप्रमाणे साफ करून घ्या. त्याचे डोके, शेपूट कापून टाका व धुवून घ्या. तुकडे करू नका. तो पूर्ण फ्राय करायचा आहे.
२. मिक्सरमध्ये कांदा, लाल मिरच्या, लसूण, आल, साखर, मीठ, जीरा जाडसर वाटून घ्या. आवश्यक तेवढच पाणी टाका. पातळ करू नका.
३. नंतर बोंबीलला वरील वाटप लावून घ्या.
४. गॅसवर पॅन ठेवून तेल टाका. नंतर त्यात बोंबिल टाका.
५. नंतर १/४ कप किंवा बोंबिल बुडतील एवढ पाणी टाका.
६. ढाकण ठेवून बोंबिल शिजू द्या. पाणी सुकल म्हणजे बोंबिल शिजले का पाहा. आवश्यक वाटल्यास किंचित पाणी टाका.
पाणी सुकले की बोंबिल फ्राय तयार.
७. गरमागरम चपाती / भाकरीसोबत सर्व्ह करा.
PGB/ML/PGB
3 Aug 2024