पारनेरच्या लेकीची वायनाडमधील बचावकार्यात अभिमानास्पद कामगिरी

 पारनेरच्या लेकीची वायनाडमधील बचावकार्यात अभिमानास्पद कामगिरी

अहमदनगर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : वायनाड (केरळ) जिल्ह्यातील चार गावात विनाशकारी भूस्खलनामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत भारतीय लष्कराच्या मदतीने बचाव कार्य वेगाने सुरू आहे. निघोज (ता.पारनेर) येथील स्वामी समर्थ बँकेचे अध्यक्ष अशोक शेळके यांची कन्या मेजर सीता शेळके यांनी या बचावकार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मेजर सीता शेळके यांनी भारतीय सैन्याच्या इंजिनिअर्स रेजिमेंटच्या टीमसोबत केरळ भूस्खलनाच्या ठिकाणी मदतकार्यासाठी पूल बांधण्यासाठी आघाडीचे नेतृत्व केले.

राज्यातून कौतुक

त्यांना मेजर अनिश यांनी सहकार्य केले. भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेने अगदी कमी कालावधीत आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी १९० फूट लांबीचा एक तात्पुरता बेली ब्रिज निर्माण केला. प्रतिकूल परिस्थितीत महिला सक्षमीकरण आणि टीमवर्कचे प्रदर्शन केले. याबाबत सामाजिक माध्यमातून ट्विट करत संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ए. भारतभूषण बाबू यांनी मेजर सीता आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. मेजर सीता यांच्या या कामगिरीचे पारनेर तालुक्यासह राज्यातून कौतुक होत आहे.

ML/ML/SL

3 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *