विशाळगड हल्ला प्रकरणी दोषीवर कारवाई व्हावी सामाजिक विचारवंतांची मागणी

 विशाळगड हल्ला प्रकरणी दोषीवर कारवाई व्हावी सामाजिक विचारवंतांची मागणी

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विशालगड हल्ल्या प्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक विचारवंतांनी मुंबई प्रेस क्लब येथे
आयोजित पत्रकार परिषदेत केली. या वेळी असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ कॅसिल रिचटिगेट द ट्रोल आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सेक्युलरिजमने कोल्हापुरातील गजापूर येथील दंग्याच्या चौकशी करताना ती निष्पक्ष व्हावी
अशी अपेक्षा या मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी तुषार गांधी,मोहम्मद अस्लम गाझी,अब्दुल मुजीब, अधिवक्ता अभय टाकसाळ, मजह फारुक,रवी पाटील,इस्माईल शेख,ॲड अकबर मकानदार, अशफाक पठाण,मेराज सिद्दीकी,प्रीतम घनघावे, मिथिला राऊत,सिराज कासिम परभोलकर आणि संयोजक शाकीर शेख आदी उपस्थित होते.

हा हल्ला पूर्वनियोजित होता.गावातील मुस्लिम अनेक पिढ्यांपासून तेथे राहतात. त्यांनी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केलेला नाही, त्यांच्याकडे जमिनी आणि घरांचे टायटल डीड, मशिदीची कागदपत्रे आहेत.या गावातील मुस्लिम पुरुष मोठ्या संख्येने मुंबई आणि इतर ठिकाणी काम करतात.सणासुदीच्या वेळी कुटुंबे भेट देतात. विशालगडमधील बेकायदा स्टॉल्सशी त्यांचा काहीही संबंध नाही असे मोहम्मद गाझी यांनी म्हटले.
विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यावर हल्ला झाल्यामुळे हल्ल्याचा हेतू राजकीय आणि जातीयवादी असल्याचे दिसून येते आणि अतिक्रमणांशी काहीही संबंध नसलेल्या मुस्लिम समाजावर हल्ला निषेधार्ह आहे.
गजापूर गाव विशाळगडपासून अवघ्या 5 किमी अंतरावर आहे. ते मुस्लिम असल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.हे सर्व हल्लेखोर बाहेरचे होते. एफआयआरमध्ये नाव असलेल्या नारायण पांडुरंग वेल्हार या स्थानिक व्यक्तीच्या घरी एका व्यक्तीच्या पुढाकाराने काही बैठका यापूर्वी झाल्या होत्या.एफआयआरमध्ये नारायण पांडुरंग वेल्हार यांचे नाव असताना पोलीस ते घेत नाहीत. ती पोलिसांनी दक्षता घ्याला हवी होती ती घेतली ली नाही. असे म्हणत नाराजी व्यक्त केली. यावेळी झालेल्या हल्ल्यात मालमत्तेची आर्थिक हानी झाली. लोकं जिवाच्या भीतीने घाबरली होती.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गजापूर हल्ल्याचा निषेध न करता विशालगडमधील बेकायदा बांधकामे हटवण्याचे आश्वासन दिले आणि 15 जुलैच्या पत्रात नमूद केल्यानुसार विशालगड येथील 35 दुकाने पाडली. या घटनेत नुकसान झालेल्या सर्वाना मोठी आर्थिक भरपाई मिळावी आणि हिंदू मुस्लिम समाजात निर्माण झालेली अविश्वासाची भावना दूर व्हावी म्हणून सरकारने प्रयत्न करावेत असे शाकीर शेख यांनी म्हटले.

SW/ML/PGB
2 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *