नवविवाहितेवर भोंदूबाबाकडून बलात्कार

 नवविवाहितेवर भोंदूबाबाकडून बलात्कार

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवविवाहितेवर एका भोंदूबाबाने उपचाराच्या नावाखाली बलात्कार केला. नाशिकच्या वडाळा गाव येथील मेहबुबनगरात ही घडली घटना आहे. पीडित महिलेच नुकतच लग्न झालं होतं. तिला पोटदुखीचा त्रास सुरु झालेला. म्हणून शुक्रवारी सासरकडच्या मंडळींच्या सल्ल्याने ती उपचारासाठी वडाळा गावातील हकीम हुसन यासीम शेखकडे गेली होती. यावेळी आरोपी हुसन यासीम शेखने पीडित महिलेला भूतबाधा झाल्याच सांगितलं.

त्याने पीडित महिलेला गुंगीच औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी हुसन यासीम शेखने, अत्याचार केल्यानंतर पीडितेला या बद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. इंदिरानगर पोलिसांनी संशयित आरोपी हुसन यासीम शेख विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. त्याला 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वीही संशयिताविरुद्ध एक गुन्हा नोंद असल्याची महिती आहे.

PGB/ML/PGB
1 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *