पुण्यात सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद

पुण्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराचा मोठा भाग, मोठ्या झाडांसह कोसळून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद झाला असून वन विभागाकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे. मात्र, दगड आणि मातीचं प्रमाण मोठं असल्यानं ही दरड हटवण्यास काही दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, सिंहगड किल्ल्यावर वाहनांना तोपर्यंत जाता येणार नाही. तसेच सिंहगड किल्ल्यावरील काही भागात दरड कोसळली असून या दरडी हटविण्याचं काम सुरू आहे.