तामागोयाकी अर्थात एग रोल 

 तामागोयाकी अर्थात एग रोल 

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
अंडी – २
सोया सॉस ( अधिक टिपा पहा) – १ टीस्पुन
मिरिन – २/३ टिस्पुन ( मिरिन इथे भारतात मिळत नाही त्यामुळे त्याऐवजी पाणी – २/३ टिस्पुन + साखर – अर्धा ते एक टीस्पुन ( चवीनुसार ) घ्यावी.
तेल – थोडेसे
ऑम्लेटचा चौकोनी / आयताकृती तवा ( असल्यास) नाहीतर छोटा गोल पसरट तवा.
तवा सपाटच हवा ( खोलगट असलेला चालणार नाही) गोल तव्यावर करणे थोडे त्रासदायक होईल, प्रयत्न करुन पहायला हरकत नाही.

तामागो म्हणजे अंडे, याकी म्हणजे ग्रील्ड. पदार्थाच्या नावात ग्रील्ड असले तरी हा ग्रील करायचा पदार्थ नाही.

क्रमवार पाककृती:
वरिल सर्व पदार्थ एका भांड्यात काढुन घेऊन हलक्या हाताने फेटा. साखर विरघळली पाहिजे.

सगळे व्यवस्थित मिक्स झाले की गॅसवर तवा तापत ठेवा. गॅस अगदी बारिक ठेवा..
तव्यावर थोडे तेल घालुन ते सर्व बाजुना पसरववुन घ्या. चौकोनी तवा असल्यास कोपर्‍यातही पसरवा.

१ – तवा तापल्यावर अंड्याच्या मिश्रणातले अगदी थोडे मिश्रण तव्यावर टाकुन तवा हलवुन सगळीकडे पटापट पसरवुन घ्या.

२ – अगदी पातळ थर तयार झाला पाहीजे. थर लगेच्च खालुन शिजेल , तेव्हा वरचा भाग ओला /अर्ध कच्चा असतानाच एका पसरट उलथण्याने हळुहळू त्या थराची गुंडाळी करा.
३ – ही गुंडाळी तव्याच्या डाव्या ( किंवा कोणत्याही) बाजुला सरकवुन ठेवा

४. आता पुन्हा एकदा आधीसारखाच पातळ थर स्टेप १ आणि २ करा. मात्र यावेळी एकाबाजुला ठेवलेली गुंडाळी घेऊन त्यावर नविन थर हळुहळू गुंडाळा.

६- सगळे मिश्रण संपुन जाड गुंडाळी झाली की एखाद दोन मिनीटाने तव्यावरुन हलकेच काढुन थंड व्हायला ताटात ठेवा.

७ – साधारण ५ मिनीटाने त्याच्या वड्या कापुन खायला द्या.

  • तवा पसरटच घ्या. नाहीतर पातळ थर करणे शक्य नाही.
  • गॅस अगदी बारिक ठेवा.
  • पहिल्य प्रयत्नात जमले नाही तरी एखाद दोन वेळा केल्यावर जमेल

तामागोयाकी अर्थात एग रोल 

PGB/ML/PGB
30 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *