लाखोंचा कर थकवल्याने खेडकर कुटुंबियांच्या मालकीच्या कंपनीचा होणार लिलाव

 लाखोंचा कर थकवल्याने खेडकर कुटुंबियांच्या मालकीच्या कंपनीचा होणार लिलाव

पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खोट्या कागदपत्रांच्या आधारे विविध सवलती मिळवत UPSC ची फसवणूक करणारी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरचा विषय देशभर गाजतो आहे. त्यातच तिचे वडिल दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त कृतीही आता समोर येत आहे. संपूर्ण कुटुंबच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असताना पुणे पोलीसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली आहे. तर UPSC ने पूजा खेडकरचे निलंबन करून तिच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता खेडकर कुटुंबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्याशी संबधित असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचा लिलाव केला जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरात पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे ही कंपनी आहे.

मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेल्या थर्मोव्हेरिटा इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महानगरपालिकेचा लाखोंचा कर थकवला आहे. त्यामुळे, ही कंपनी कर संकलन विभागाकडून सील करण्यात आली होती. आता मात्र थकीत कर निर्धारित वेळेत न भरल्यास ही कंपनी लिलावत काढली जाणार आहे. लवकरच लिलाव प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील अशाच पद्धतीने कर बुडविणाऱ्या इतर सुमारे 80 मालमत्तांचा देखील लिलाव केला जाणार आहे. देशमुख यांनी याबद्दलही माहिती दिली आहे.

आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या युपीएससी कोटाच्या बनावट कागदपत्रांमुळे चर्चेत आहे. तिचं कुटुंबीयही या वादात सापडलं आहे. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याच्या आरोपानंतर पूजा खेडकर वादात अडकलीय. तिला मंगळवारी २३ जुलै रोपी मसूरीतील लाल बहाद्दुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत दाखल व्हायचं होतं. पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवून त्यांना तातडीने मसुरीला य़ेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तिने रिपोर्ट केलं नसल्याची माहिती समोर आलीय. तसंच तिने याबाबत मसूरीत अकादमीलासुद्धा काही कळवलेलं नाही.

SL/ML/SL

27 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *