Paris Olympic – मनू भाकर 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत
पॅरिस, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उद्या होणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिच्याकडून सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा ठेवली जात आहे. मनूने पात्रता स्पर्धेत 600 पैकी 580 गुण मिळवले आणि 45 नेमबाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत दुसरा भारतीय नेमबाज रिदम सांगवान अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. सांगवान 573 गुणांसह 15व्या स्थानावर आहे. टॉप-8 नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
मनू भाकर 20 वर्षांनंतर नेमबाजी ऑलिम्पिकच्या वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. तिच्या आधी सुमा शिरूर 2004 ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत पोहोचली होती.
याआधी चीनने पॅरिस ऑलिम्पिक-2024 चे पहिले सुवर्ण जिंकले होते. चीनी संघ 10 मीटर रायफल मिश्रित नेमबाजी स्पर्धेत चॅम्पियन ठरला. रिपब्लिक ऑफ कोरिया दुसरे आणि कझाकिस्तान तिसरे आले. कझाक संघाने या खेळांचे पहिले पदक जिंकले.
याच स्पर्धेत भारतीय जोडी सहाव्या आणि 12व्या स्थानावर राहिल्या. भारताचा संघ-2 रमिता (314.5) आणि अर्जुन (314.2) एकूण 628.7 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे, तर संघ-1 ची जोडी इलावेनिल (312.6) आणि संदीप (313.7) एकूण 626.3 गुणांसह 12व्या स्थानावर आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सरबज्योत सिंग आणि अर्जुन सिंग चीमा हे भारतीय नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. सरबजोत 9व्या तर अर्जुन 18व्या स्थानावर आहे.
SL/ML/SL
27 July 2024