अंडा बिर्याणी

 अंडा बिर्याणी

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: 

४५ मिनिटे

लागणारे जिन्नस: 

४-६ अंडी
३ वाट्या बासमती तांदूळ
४ लवंगा
१ पेरभर दालचिनीचा तुकडा
६-७ मिरंदाणे
४ वेलदोडे
२ तमालपत्रं
१ काळा वेलदोडा
१ मोठा चमचा धनेपूड
भाताच्या अंदाजानं चवीपुरतं मीठ
एक वाटी घट्टं दही
चमचाभर टोमॅटोपेस्ट
४ हिरव्या मिरच्या
३ मोठे कांदे, पातळ, उभे चिरून
७-८ पानं पुदिना, चिरलेला
पळीभर साजुक तूप
पाव कप दुधात १०-१२ तंतू केशर
दोन पळ्या तेल
२ मोठे चमचे एव्हरेस्ट बटरचिकन मसाला
चवीनुसार तिखट

क्रमवार पाककृती: 

– तांदूळ २-३दा धुवून, पाण्यात तासभर भिजवून ठेवावे. निथळून घ्यावे.
-अंडी उकडून (हार्ड बॉइल), सोलून बाजूला ठेवावी.
-७-८ वाट्या पाण्याला, त्यात लवंगा, वेलदोडे, मीठ आणि चमचाभर तेल घालून उकळी आणावी.
– निथळलेले तांदूळ घालावे.
– तांदूळ शिजत आले की चाळणीत ओतून, पाणी काढून टाकून, लागलीच ताटात भात मोकळा करावा. ताटाखाली स्टँडचं कोस्टर असल्यास उत्तम.

-मोठ्या, जाडबुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात चिरलेल्या कांद्यातला अर्धा भाग खरपूस तळून बाजूला ठेवावा.
-त्याच तेलात आता उरलेला कांदा परतून घ्यावा.
-मिरच्या घालाव्या.
-तमालपत्र, मिरं, मोठा वेलदोडा (सगळे अख्खे मसाले) घालून परतावं.
-धनेपूड, तिखट आणि बटरचिकन मसाला घालून जरासं परतलं की टोमॅटोपेस्ट घालावी.
– दही घालून एकत्र करून घ्यावं.
-या मिश्रणात अंडी अख्खी किंवा काप करून घालावी.
-वरून भात घालावा.
-भातात तूप सोडावं
-भातात, भांड्याच्या बुडापर्यंत खड्डे करून, त्यात केशर+दूध घालावं.
-चिरलेली पुदिन्याची पानं घालून, घट्टं झाकण लावून १० मिनिटं मंद आचेवर शिजवावं.
-वरून खमंग तळलेला कांदा घालावा.

घटकपदार्थ भरपूर दिसत असले, आणि कृतीतल्या पायर्‍याही बर्‍याच दिसल्या तरी लवकर होणारा पदार्थ आहे.

ML/ML/PGB
26 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *