मुसळधार पावसामुळे ऑफिसनाही दिली सु्ट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

राज्यातील विविध भागासह पुण्याला पाऊस झोडपत आहे. अशात खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. गुरूवार दुपारनंतर पावसाचा जोर काही ठिकाणी वाढला आहे. हे लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. त्यानुसार कार्यालयीन कर्मचारी घरी परतत आहेत.