सांगलीत कृष्ण नदीची पाणी पातळी वाढली, सतर्कतेचा इशारा…
सांगली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढवत आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाण्याची पातळी 30 फुटावर गेली असून मिरजेत कृष्णा नदीची पाण्याची पातळी 43 फुटावर आहे. कृष्णा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर गेला असून अनेक शेतामध्ये पाणी गेलं आहे. सांगलीतील सूर्यवंशी प्लॉटमधील सहा कुटुंब आणि स्वतःहून स्थलांतर केला आहे.
नदीकाठच्या गावांना आणि लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा आदेश दिला आहे. दरम्यान सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी आज मिरजेतील कृष्णा घाट परिसराची पाहणी केली आहे. जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन एनडीआरएफ संभाव्य पुरस्थितीसाठी सज्ज झाल आहे. दरम्यान सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती बाबत प्रश्न मांडला आणि या भागातील स्थितीची माहिती दिली.
ML/ML/ SL
24 July 2024