बँका पीककर्ज देत नाही, सरकारची बँकांशी मिलीभगत

 बँका पीककर्ज देत नाही, सरकारची बँकांशी मिलीभगत

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्यापारी बँका आणि काही खासगी बँका अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिबिलची सक्ती करून पीककर्जाबाबत अडवणूक करत आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात ढकलणाऱ्या बँकांवर सरकार कडक कारवाई करत नाही असे म्हणत असताना सरकारची आणि बँकांची ही मिलीभगत आहे का अशी शंका त्यांनी उपस्थित केली.

यावर सविस्तर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, सरकारच्या कारवाईच्या बडग्याला न भीता व्यापारी आणि खासगी बँका अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिबिलची सक्ती करून पीककर्जाबाबत अडवणूक करत आहेत. त्यामुळे शेतकरी राजाला सावकाराच्या दारात जावं लागत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाच या बँका केराची टोपली दाखवत असतील तर सामान्य शेतकऱ्यांचे काय ऐकतील? त्यामुळे सरकारने या बँकांना लाडीगोडी न लावता कर्ज देत नसतील तर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सावकारी जाच पुढे शेतकऱ्यांना किती छळतो, या जाचामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या वाढते याची सरकारला चांगली कल्पना आहे. तरी शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात ढकलणाऱ्या बँकांवर सरकार कडक कारवाई करताना दिसत नसेल तर ही सरकारची आणि बँकांची मिलीभगत आहे अशी शंका मनात येते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आपल्या एक्स हँडलवरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

ML/ML/SL
22 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *