पहिल्या तिमाहीत Reliance Jio ला 5,445 कोटी रुपयांचा निव्वळ नफा
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनंत अंबानीचा भव्य लग्न सोहळा सुरु असतानाच एकीकडे Jio ने रिचार्जचे दर वाढवले. त्यामुळे त्यांना सोशल मिडियावर टिकेला सामोरे जावे लागत आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जिओने विक्रमी नफा कमावला आहे.
रिलायन्स जिओ लिमिटेडने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 5,445 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. तिमाही आधारावर 2% ची वाढ झाली आहे. एप्रिल-जून तिमाहीत कंपनीच्या महसुलातही 2% वाढ झाली आणि ती 26,478 कोटी रुपये झाली. कंपनीने आज (शुक्रवार, 19 जुलै) आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.
शेवटच्या तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक (YoY) आधारावर 13% ने वाढून 4,716 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 4,173 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. सेवांच्या मूल्यातून जिओचे उत्पन्न Q4FY24 मध्ये वाढून 27,539 कोटी रुपये झाले. जानेवारी-मार्च 2023 मध्ये ते 24,602 कोटी रुपये होते.
रिलायन्स जिओची मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स आज (19 जुलै) 1.78% घसरले आणि 3,116.59 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या समभागांनी गेल्या 5 दिवसात 1.86% नकारात्मक परतावा दिला आहे. गेल्या 1 महिन्यात 6.84%, 6 महिन्यांत 13.97% आणि एका वर्षात 9.68% परतावा दिला आहे. जर आपण या वर्षाबद्दल बोललो तर 1 जानेवारीपासून आतापर्यंत रिलायन्सच्या शेअर्समध्ये 20.33% वाढ झाली आहे.
SL/ML/SL
19 July 2024