पुणे पोलिसांनी दिली पूजा खेडकर यांना दुसरी नोटीस

वाशिम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकर यांची भेट घेऊन आज दुसरी नोटीस दिली. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्या संदर्भात पूजा खेडकर यांना उद्या २० तारखेला पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती देण्यात आली आहे.पूजा खेडकर यांना या आधी नोटीस देऊन काल १८ जुलै रोजी पुणे येथे उपस्थित राहण्यास सांगितलं होतं मात्र त्या उपस्थित न राहिल्यानंतर दुसरी नोटीस देण्यात आली .पूजा खेडकर सध्या वाशीम येथील विश्रामगृहावर मुक्कामी असून उद्या जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे.
ML/ ML/ SL
19 July 2024