उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निधी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाची मंजुरी

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्या काही वर्षांपासून ग्रासणारे निराशेचे मळभ आता हळूहळू दूर होताना दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी काही अनुकूल घटना घडत आहेत. उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेना दोन गटात विभागली गेली. यानंतर सर्वच गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने गेल्या. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचं सर्वाधिक पाठबळ हे एकनाथ शिंदे यांनाच मिळालं. निवडणूक आयोगात ठाकरे गटाला सातत्याने निराशा मिळाली. पण आता पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला यापुढे निधी स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारता येणार आहे. खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटात आनंदाचं वातावरण आहे. निवडणूक आयोगाने नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालादेखील निधी स्वीकारण्यास मंजुरी दिली होती. शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनीदेखील निवडणूक आयोगात याबाबतची मागणी केली होती. उद्धव ठाकरेंची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे
SL/ML/SL
18 July 2024